पर्यटक बनून सराफाच्या दुकानात घुसलेल्या एका नेपाळी टोळीने पाच लाखांचा सोन्याचा हार लंपास केला. खार येथील एका सरफाच्या दुकानात गुरूवारी सकाळी ही घटना घडली. विशेष म्हणजे या टोळीत चार महिलांचा समावेश आहे.
खार पश्चिमेला चोईतराम अ‍ॅण्ड सन्स नावाचे सराफाचे दुकान आहे. मालक नरेश चैनानी यांनी सकाळी साडेदहाच्या दुकान उघडताच साडेदहाच्या सुमारास पाच नेपाळी जणांचा गट दुकानाच शिरला. त्यांनी पर्यटक असल्याचे भासविण्यासाठी टोपी, बॅगा घेतल्या होत्या. त्यात दोन वयस्कर महिलांसह एकूण चार महिला होत्या. दुकानात हिऱ्याचे दागिने बघण्यास त्यांनी सुरवात केली. मात्र मालक एकटे असल्याची संधी साधत त्यांनी काचेच्या कपाटातील एक सोन्याचा हार लंपास केला. त्याची किंमत पाच लाख रुपये होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा हा प्रकार चित्रित झाला. खार पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.
दागिने चोरी प्रकरणी आणखी दोघांना अटक
कुरियर कंपनीची गाडी रस्त्यात अडवून पाच कोटी रुपयांचे दागिने लुटल्याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी आणखी दोन आरोपींना अटक केली. या आरोपींनी १५ दिवसांपूर्वी दरोडय़ाचा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे.  काळबादेवी येथील साई कुरियरची मारूती स्विफ्ट गाडी दागिने घेऊन विमानतळाकडे निघाली होती. वांद्रे उड्डाणपूलावजवळ चार आरोपींनी ही गाडी अडवली होती. त्यातील दोन जण पोलीस होते. तपासणी करण्याच्या नावाखाली त्यांनी गाडीतील व्यवस्थापक अमित सोनी यांच्यासह तिघांना खाली उतरवलेआणि नंतर पोबारा केला . याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक मारूती ढेंगळे आणि नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार मयूर दांगडे यांना अटक केली आहे. आता अटकेतील आरोपींची संख्या आठ झाली आहे. कुरियर कंपनीत मारूती गाडीचा चालक खुशबुद्दीन शेख याने कंपनीच्या व्यवहाराची माहिती पुरविल्यानंतर हा कट रचला होता अशी माहिती पुढे आली आहे.
 बारमधील वेश्याव्यसाय उघड, ५७ मुलींची सुटका
बारच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने उघडकीस आणला आहे. मुंब्रा पनवेल रोडवरील एसएक्स ४ या बारवर बुधवारी रात्री छापा घालून ५७ मुलींची सुटका करण्यात आली. त्यातील २८ मुली या अल्पवयीन होत्या.  मुंब्रा पनवेल महामार्गावरील दहिसर गावाजवळ एसएक्स ४ हा बार आहे. या बारमधून वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज पटेल यांच्या पथकाने छापा घातला तेव्हा बार मध्ये ५७ मुली आढळल्या. पोलिसांनी या मुलींची सुटका केली. त्यात १७ मुली अल्पवयीन आहेत.