News Flash

धनगर समाज संशोधनाबाबतचा ‘व्हॉटस् ॲप’वरील संदेश खोटा; टाटा समाज विज्ञान संस्थेचे स्पष्टीकरण

आदिवासी विकास विभागाचा खुलासा

संग्रहित छायाचित्र

धनगर समाजाबाबत केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षाबाबत ‘व्हॉटस् ॲप’वर व्हायरल झालेला संदेश हा खोटा असल्याचे टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसकडून राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. या संदेशात टाटा समाज विज्ञान संस्थेच्या (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) लोगोचा गैरवापर करण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

राज्यातील ‘धनगर’ ही भटकी जमात व ‘ओराओन, धनगड’ या अनुसूचित जमातीबाबत अभ्यासपूर्वक संशोधनाचे काम २२ सप्टेंबर २०१५ च्या शासन पत्रान्वये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या स्वायत्त संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्यामार्फत ‘धनगर’ ही भटकी जमात व ‘ओराओन, धनगड’ या अनुसूचित जमातीबाबत सामाजिक मानवशास्त्रीय अभ्यास संशोधनाचे काम सुरु आहे. या संस्थेकडून त्यांचा अंतिम अहवाल डिसेंबर २०१७ पर्यंत शासनास सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप कोणताही अहवाल त्यांच्याकडून शासनाला प्राप्त झालेला नाही.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेने धनगर समाजाबाबत केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षाबाबत चुकीच्या स्वरुपाचा संदेश रविवारपासून ‘व्हॉटस् ॲप’ वर व्हायरल झाला आहे. ही बाब सोमवारी, ७ ऑगस्ट २०१७ रोजी ई-मेलव्दारे शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्यावतीने कार्यासन अधिकारी सु. सी. पाटील यांनी हा खुलासा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 6:16 pm

Web Title: false message on whatsapp about dhangar community research stated tiss
Next Stories
1 अखेर १६ तासांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे
2 अखेर उंचीची हंडी फुटली; हायकोर्टाकडून दहीहंडीवरील निर्बंध मागे
3 कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्रावर मोफत सोय : सुभाष देशमुख
Just Now!
X