News Flash

मारहाणीविरोधात नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रारदार यांचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे.

संग्रहीत

मुंबई : पाणीपुरीवाल्याला मारहाण केल्याप्रकरणी पश्चिम उपनगरातील भाजपाच्या नगरसेविकेसह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेविकेने पाणीपुरीवाल्याला मारहाण करून त्याच्या दुकानाचे शेड तोडले, असा आरोप तक्रारीत  केला आहे.

तक्रारदार यांचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. ते पाणीपुरीची पार्सलद्वारे विक्री करत असताना त्या ठिकाणी नगरसेविका दाखल झाल्या. त्यांनी शिवीगाळ करून हाताने आणि दुकानातील नळाने मारहाण केली. तसेच त्यांनी अन्य तिघांना बोलवून घेऊन जेसीबीच्या साहाय्याने दुकानाचे शेड पाडले. तसेच दुकानात आलेल्या एका आरोपीने २८ हजार रुपये चोरून नेले, असा आरोप पाणीपुरी विक्रेत्याने केला आहे. दरम्यान या प्रकरणातच नगरसेविकेने काही दिवसांपूवी पाणीपुरी विक्रे त्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:01 am

Web Title: filed case against bjp corporator assault panipuri akp 94
Next Stories
1 धारावीत घरोघरी जाऊन लसीकरणाची नोंदणी
2 मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबतचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार!
3 “देर आये दुरुस्त आये”, पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादीचा टोला
Just Now!
X