मुंबई सेंट्रल कारशेडमधील घटना; रेल्वे प्रशासनाकडून फेऱ्या रद्द

मुंबई : मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये उभ्या असलेल्या वातानुकूलित लोकल गाडीच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे शुक्रवारी प्रवाशांसाठी लोकल चालवणे शक्य नसल्याने त्याच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या घटनेची चौकशी के ली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

गुरुवारी मध्यरात्री १.४० वाजता मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये बारा डबा वातानुकू लित लोकल गाडीच्या सहाव्या डब्याला अचानक आग लागली. आगीची झळ डब्यावरील पेन्टाग्राफलाही बसली. त्यामुळे कारशेडमधील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक यंत्रणा आणि पाण्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले, तर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर पहाटे ३.१० च्या सुमारास आग विझली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली होती.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी या घटनेची चौकशी के ली जाणार असल्याचे सांगितले. एकाच डब्याला आग लागली होती. हीच लोकल नुकतीच प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. आग लागल्याने लोकलच्या दहा फे ऱ्यारद्द करण्यात आल्या. त्याऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या चालवण्यात आल्या. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी दोन वातानुकू लित लोकल आहेत. परंतु त्या सज्ज नसल्याने ताफ्यात आणल्या नाहीत.