२५४ टँकर पाण्याचा वापर

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग रविवारी पहाटे ५ वाजता (सुमारे ५६ तासांनी) पूर्णत: शमल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. शनिवारी आग नियंत्रणात आल्यानंतर प्रत्यक्षात संपूर्ण इमारत थंड करण्याची प्रक्रिया रविवारी पहाटे ५ वाजता पूर्ण झाली. ही आग विझवण्यासाठी एकूण २५४ टँकर पाणी वापरण्यात आले.

नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री नऊ वाजता आग लागली होती. ही आग शनिवारी रात्री नियंत्रणात आली. रविवारी पहाटेपर्यंत इमारतीचे कूलिंग ऑपरेशनही अर्थात थडं करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनेची चौकशी..

’ या मॉलमध्ये काही बेकायदा बदल करण्यात आले आहेत का, तसेच काही बेकायदा गाळेही तयार करण्यात आले होते का, याबाबतची चौकशी अग्निशमन दलातर्फे सोमवारपासून करण्यात येणार आहे.

’ या मॉलमधील अंतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणाही काम करत नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व बाबींची चौकशी केली जाणार आहे.

’ यात, घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी तसेच सुरुवातीला पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाची साक्षही घेतली जाणार आहे.

’ सन २०१६  मध्ये देवनार डंपिंगला लागलेली आग सहा दिवस धुमसत होती.