उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ
आर्थिक टंचाईपायी सरकारी नोकर भरतीवर घालण्यात आलेल्या र्निबधामुळे नोकरीची संधी गमावण्याच्या चिंतेत असलेल्या आणि वयाची ३३ वर्षे पार करीत असलेल्या लाखो उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकारी सेवेतील प्रवेशाच्या कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांनी वाढ केली आहे. त्यामुळे ३८व्या वर्षांपर्यंत सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या ४३व्या वर्षांपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
राज्यात सध्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या १९ लाख आहे. त्यांचे वेतन, भत्ते तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर होणारा खर्च लक्षात घेता सरकारी तिजोरील ४७ टक्के निधी आस्थापनेवर खर्च होत आहे. या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नोकरभरतीवर र्निबधांचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांत अनेक विभागांत विविध संवर्गातील सुमारे लाखभर जागा रिकाम्या असतानाही केवळ अत्यावश्यक ठिकाणीच नोकर भरतीला परवानगी दिली जात आहे. त्याचवेळी नोकरीसाठी पात्र असूनही संधी मिळत नसल्याने अनेक तरुण धास्तावले होते. आता या नव्या निर्णयाचा राजकीय लाभ उठवत सरकारी पदे भरताना आपल्या कार्यकर्त्यांची किंवा नातेवाईकांची वर्णी लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करील, अशीही चिन्हे आहेत.

नोकरीची संधी..
* खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३३ वरून ३८ वष्रे होणार.
* मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्याची ३८ वर्षांची वयोमर्यादा ४३ वष्रे होणार.
* मात्र सध्याच्या ज्या प्रवर्ग किंवा घटकांची कमाल वयोमर्यादा ४३ वष्रे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यात कोणतीही वाढ नाही.

Traffic jam, Kalyan Dombivli,
कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण
Narendra modi
Vision 2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पुढच्या २५ वर्षांचं नियोजन, म्हणाले, “१५ लाखांहून अधिक…”
sharad pawar health in loksabha
वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार ‘अशी’ घेतात आपल्या आरोग्याची काळजी
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!