10 August 2020

News Flash

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर धाड

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली.या सट्टेबाजांकडून ९२ मोबाइल फोन, ३० सिमकार्डे १ दूरचित्रवाणी संच आणि एक लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले आहेत. हे

| May 16, 2013 02:45 am

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली.या सट्टेबाजांकडून ९२ मोबाइल फोन, ३० सिमकार्डे १ दूरचित्रवाणी संच आणि एक लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले आहेत. हे सट्टेबाज पाकिस्तान व दुबई येथील बुकींचा भारतातील बुकींशी संपर्क घडवून आणत होते.

लालवाणी मेन्शन, रुम नं. २७, दुसरा माळा येथे रमेश व्यास आणि त्याचे साथीदार सट्टा लावत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्ष व गुन्हेगारी कक्षाला मिळाली. त्यानुसार धाड टाकली असता रमेश व्यास, पांडुरंग कदम आणि अशोक व्यास हे तिघे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यावर जुगार खेळून सट्टा लावत असल्याचे आढळले. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग गोपाळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2013 2:45 am

Web Title: forage on ipl betting gang
टॅग Ipl
Next Stories
1 मतिमंद मुलीवर बलात्कार
2 अखेर संजय दत्त न्यायालयापुढे शरण
3 येरवड्यात शरणागतीसाठीचा अर्ज संजय दत्तकडून मागे
Just Now!
X