07 April 2020

News Flash

तळोजात एकाच घरात आढळले चारजणांचे मृतदेह, दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या?

याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत

तळोजा येथील सेक्टर ९ मध्ये असलेल्या एका इमारतीत एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. उपाध्याय असं या कुटुंबीयांचं नाव आहे. या सगळ्यांनी गळफास घेऊन दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. कारण हे सगळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहेत. तळोजा या ठिकाणी असलेल्या सेक्टर ९ मधील शिव कॉर्नर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या मृतदेहांमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब इथे भाडे तत्त्वार रहात होते. हे घर राजेश भारतद्वाज यांच्या नावावर आहे. तिथे उपाध्याय हे कुटुंब भाडेतत्त्वावर रहात होते. दोन महिन्यांपूर्वी या कुटुंबाने आत्महत्या केली असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या होऊनही सोसायटीत कुणालाही पत्ता कसा लागला नाही? याबाबतचं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 4:13 pm

Web Title: four dead bodies found at taloja society in close home scj 81
Next Stories
1 ठाकरे सरकारच्या रिमोट कुणाच्या हाती? शरद पवारांनी दिलं स्पष्ट उत्तर
2 ८० व्या वर्षांत पदार्पण करतोय, आता या वयात आपण थांबायचं…; शरद पवारांच्या विधानाची चर्चा
3 नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
Just Now!
X