शिवडी येथील दारूखाना परिसरातील एका झोपडीला रविवारी पहाटे लागलेल्या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.दारूखाना येथील नगिना मस्जीद जवळील झोपडपट्टीत लागलेल्या या आगीत अनिता, पुजा, प्रदीप आणि लक्ष्मी बात्रा यांचा  होरपळून मृत्यू झाला. बात्रा यांच्या झोपडीत लाईट नसल्याने रॉकेलचा दिवा पडून ही दुर्घटना घडल्याचे अग्निशमन दलाच्या
सूत्रांनी सांगितले.