मुंबईतील गोरेगाव परिसरात चार वर्षांंच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला पोलीसांनी अटक केली.
गुरुवारी रात्री गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरात घडलेल्या घटनेत आरोपी त्या मुलीचा नातेवाईक असून त्याने अल्पवयीन मुलगी जिथे झोपली होती त्या खोलीत जबरदस्तीने प्रवेश केला. पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंडविधान आणि बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांसाठीच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.