News Flash

विघ्न कायम ! पेट्रोल-डिझेलची शतकाकडे आगेकूच

देशभरात सातत्याने सुरू असलेली इंधन दरवाढ आजही सुरूच आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

देशभरात सातत्याने सुरू असलेली इंधन दरवाढ आजही सुरूच आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. परिणामी एक लिटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 89.97 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रति लिटर डिझेलचा दर आज 78.53 रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मात्र आज डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 17 पैशांनी वाढल्यामुळे आज एक लिटर पेट्रोलसाठी 82.61 रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीत डिझेलचा दर 73.97 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्यानं सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 8:31 am

Web Title: fuel price continue to rise 2
Next Stories
1 पाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज
2 कमांडर अभिलाष टॉमी यांच्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न
3 न्या. कावनॉग यांची सुनावणी लांबणीवर
Just Now!
X