ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची ९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या रविवारी माटुंगा येथे झालेल्या बैठकीत ही निवड झाली. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

नियोजित नाटय़ संमेलनाचे स्थळ अद्याप निश्चित झाले नसले तरी सातारा शहराला नाटय़ परिषदेने पसंती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
‘वस्त्रहरण’ या नाटकाने गवाणकर यांना लोकप्रियता मिळवून दिली. या नाटकाचे आजवर ५,४०० प्रयोग झाले आहेत.
‘लोकसत्ता लोकांकिका’ हे पुण्यकर्म
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘लोकांकिका’ स्पर्धा सुरू करून ‘लोकसत्ता’ने खूप मोठे पुण्यकर्म केले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळण्यास त्यामुळे खूप मोठी मदत होईल. यातून नवे कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक मिळतील आणि मराठी व्यावसायिक रंगभूमी अधिक समृद्ध होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

Kapil Patil met Raj Thackeray,
भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्याकडून मनसेचे राज ठाकरे यांची भेट
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
satej patil , raju shetty
साखरपुडा – लग्नावरून सतेज पाटील – राजू शेट्टी यांच्यात जुंपली
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान

कार्यालेख

’ मराठी रंगभूमीवर
मालवणी नाटकांची स्वतंत्र लाट
’‘वेडी माणसे’ हे त्यांचे पहिले नाटक.
’‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ ही नाटके
’त्यांनी लिहिलेली ‘व्हाया वस्त्रहरण’, ‘ऐसपैस’ ही पुस्तके.
’‘वस्त्रहरण’ नाटकातून मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट
’‘वात्रट मेले’चे दोन हजारांवर प्रयोग, ‘वन रूम किचन’चे एक हजार प्रयोग
’वस्त्रहरण’च्या प्रयोगाच्या वेळी गाजलेले किस्से असलेले ‘व्हाया वस्त्रहरण’ हे आत्मकथन
’दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या भारत रंगमहोत्सवात ‘वस्त्रहरण’चा प्रयोग

नाटय़ संमेलनाध्यक्ष पदाचा मिळालेला हा सन्मान नाटकांतील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, माझी नाटके सादर करणाऱ्या नाटय़ संस्था आणि रसिकांचा आहे. हे सर्व श्रेय त्यांचे आहे. याचा मला आनंद होत आहे. ‘वस्त्रहरण’सारख्या मालवणी भाषेतील नाटकाचे रसिकांनी स्वागत केले. यातच सर्व काही आले.
– गंगाराम गवाणकर,
नियोजित नाटय़ संमेलनाध्यक्ष