काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी तक्रार दाखल केली. कंत्राटदारांनी १०० कोटी रुपये लाच देऊ केल्याचे महाजन यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.लाच देऊ करणे हा गुन्हा आहे आणि तो दडवून ठेवणेही गुन्हा आहे. महाजन यांनी लाच देऊ केल्याप्रकरणी कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल न करता दडवून ठेवला. त्यामुळे सावंत यांनी महाजन यांच्याविरुध्द आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आहे.