News Flash

पित्यानेच बलात्कार करून मुलीची हत्या केली

मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या पित्याने स्वत:च्याच मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना काशिमिरा

| November 6, 2013 06:33 am

मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या पित्याने स्वत:च्याच मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना काशिमिरा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पित्यासह आणखी दोघांना अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे राहणाऱ्या रमेश राजभर (४५) याच्या १७ वर्षीय मुलीचे त्याच गावात राहणाऱ्या अनिल राजभर या तरुणाशी प्रेमसंबध होते. चार महिन्यांपूर्वी त्याची मुलगी अनिलबरोबर पळून मुंबईत आली होती. ते दोघे काशिमीरा येथे राहात असल्याचे राजभरला समजले होते. त्यामुळे तो सुद्धा काशिमीरा येथे आपला एका परिचित राजू राजभर (४२) याच्याकडे आला. त्याने मुलीला समजावून पुन्हा गावी येण्यास सांगितले होते. त्याला ती तयार होत नव्हती. त्यामुळे रमेश संतप्त झाला होता.
३१ ऑक्टोबर रोजी रात्री रमेशने मुलीवर बलात्कार करून ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. परिसरातल्या लोकांना राजभरची मुलगी दिसत नसल्याने संशय आला होता. त्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी राजभरची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रविवारपासून पोलिसांनी जंगलात शोध सुरू केला होता. सोमवारी मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. पोलिसांनी रमेश राजभर आणि या कामी त्याला मदत करणारा राजू राजभर या दोघांना अटक केली असून त्यांना १५ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 6:33 am

Web Title: girl raped killed by father his friend
Next Stories
1 ‘एकात्मिक झोपु वसाहतीसाठी ७० टक्क्यांची अट नको’
2 तीन आरोपी गजाआड
3 प्रियकराकडून फॅशन डिझायनरची हत्या
Just Now!
X