News Flash

आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, भाजपाचे गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत

गोपीचंद पडळकर यांनी चुकवला फोटो

संग्रहित

गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती, गोपाळ गणेश आगरकर हे थोर समाजसुधारकांपैकी एक. लोकमान्य टिळक आणि गोपाळगणेश आगरकर हे एकेकाळचे चांगले स्नेही. त्यामुळे टिळक आगरकर हे महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. आज गोपाळ गणेश आगरकरांच्या जयंतीच्या दिवशी चर्चा होते आहे ती भाजपाच्या गोपीचंद पडळकरांची. गोपीचंद पडळकर यांनी गोपाळ गणेश आगकरांना आदरांजली वाहिली. मात्र त्या आदरांजलीत फोटो वापरला लोकमान्य टिळक यांचा. त्यामुळे गोपीचंद पडळकर या नावाची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हीच ती पोस्ट ज्यामुळे पडळकर ट्रोल होत आहेत 

 

गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले होते. शरद पवार आणि करोना यावरुन त्यांनी अत्यंत अशोभनीय वक्तव्य केलं होतं. यावरुन त्यांच्यावर चांगलीच टीकाही झाली होती. काही दिवसांपूर्वी एका वक्तव्यामुळे चर्चेत असलेले गोपीचंद पडळकर हे आता चुकीचा फोटो पोस्ट केल्याने पु्न्हा चर्चेत आले आहेत. टिळक आणि आगरकर यांच्यातला फरकही समजत नाही, चुकीचे फोटो लावणारे नेते या आणि अशा प्रकारच्या कमेंट्स देत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 6:28 pm

Web Title: gopichand padalkar troll because he post lokmanya tilak photo on agarkar jayanti scj 81
Next Stories
1 वसई-विरार पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेकडून घोषणाबाजी, शिवीगाळ
2 वरवरा राव यांना तळोजा कारागृहात चक्कर, जेजे रुग्णालयात केले दाखल
3 प्रत्येक पोलिसाची अद्ययावत वैद्यकीय माहिती गोळा करणार!
Just Now!
X