15 January 2021

News Flash

‘गोरेगाव फिल्मसिटी’ पर्यटकांसाठी खुली

मात्र, करोनाच्या भीतीपायी अजूनही पर्यटकांचा नगण्यच प्रतिसाद मिळत आहे.

 

‘बॉलीवूड टुरिझम’ प्रकल्पाला पर्यटकांचा नगण्य प्रतिसाद

 

मुंबई : करोनामुळे सहा महिने बंद असलेली गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी गेल्या आठवड्यापासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.  मात्र, करोनाच्या धास्तीपायी अजूनही बॉलीवूड टुरिझम या प्रकल्पाला पर्यटकांचा नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले तरीही फिल्मसिटीतील पर्यटनास परवानगी देण्यात आली नव्हती. सहा महिने ‘बॉलीवूड टुरिझम’ हा पर्यटन व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या चालक, वाहक, सेवक, अभिनेते, अशा ३० कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडाला होता. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून चित्रनगरीतील पर्यटन सुरू करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे राज्य शासनाला निवेदनही दिले होते. आणि आता १५ ऑक्टोबरपासून फिल्मसिटी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, करोनाच्या भीतीपायी अजूनही पर्यटकांचा नगण्यच प्रतिसाद मिळत आहे.

‘करोनामुळे बंद असलेले फिल्मसिटीतील पर्यटन गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आले. यासाठी एक महिन्यापासून आम्ही नियोजन करीत होतो. आधी कर्मचाऱ्यांना करोनाकाळात घ्यायची काळजी, सुरक्षेचे उपाय यांचे प्रशिक्षण देण्यात आले.  गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यात आले असून सध्या आठ कर्मचारी काम करीत आहेत. गेल्या आठवड्यात के वळ सात ते आठ पर्यटकांनी चित्रनगरीस भेट दिली. करोनाच्या धास्तीपायी अजूनही पर्यटक येण्यास कचरत आहेत. दिवाळीत जास्त पर्यटक येण्याची अपेक्षा आहे,’ असे प्रकल्पाचे व्यवस्थापन करणारे जयशील मिजकर यांनी सांगितले.

फिल्मसिटीत पर्यटकांसाठी नियम

  •   निर्जंतुकीकरण, अंतरनियमांचे पालन, मुखपट्टी, हातमोजे, तापमानाची नोंद या गोष्टी बंधनकारक आहेत.
  •  वातानुकूलित बसचे तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे.
  •  करोनाची सौम्य लक्षणे आढळल्यास पर्यटकांना प्रवेश नाही.
  • अल्पोपाहार देण्यास मनाई करण्यात आली असून पर्यटकांनी घरूनच खाद्यपदार्थ आणावेत.
  •  ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच गर्भवती महिला यांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
  •   पर्यटकांकडून चित्रीकरणात तसेच कलाकारांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • बसमध्ये ५० टक्के  पर्यटकांना प्रवेश देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 1:04 am

Web Title: goregaon film city is open to tourists akp 94
Next Stories
1 मुंबईत १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार
2 प्रवेश होईपर्यंत अकरावीसाठी ऑनलाइन अभ्यास
3 पोलिसांची खाती एचडीएफसी बँकेत
Just Now!
X