औषधाची मात्रा, मिश्रण, दर्जा यांवर नियंत्रण नसल्याने चिंता; स्थानिक लोकप्रतिनिधींकडून घराघरांत सर्रास वाटप

शैलजा तिवले, लोकसत्ता

Traffic jam, Kalyan Dombivli,
कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

मुंबई : करोना विषाणूवर प्रतिबंधात्मक औषध म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालयाने नमूद केलेल्या होमिओपॅथीच्या ‘अर्सेनिक अल्बम ३०’ गोळ्यांचे सर्रास वाटप सध्या सुरू आहे. महापालिका प्रशासनांखेरीज, स्थानिक डॉक्टर, लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते यांच्याकडून घरोघरी या गोळ्या वाटण्यात येत आहेत. मात्र, त्या गोळ्यांच्या निर्मितीचा स्रोत, औषधाच्या डोसचे प्रमाण आणि वाटपाच्या चुकीच्या पद्धती यांमुळे या गोळ्यांचा दर्जा, परिणामकारकता याविषयी शंका निर्माण होत आहेत.

इमारत, चाळींच्या प्रतिनिधींकडे या गोळ्यांसोबत एक सूचनापत्रक सोपवून वाटण्यासाठी दिले जाते. यावर मात्र हे औषध कोणत्या डॉक्टरने दिले आहे, याचा मात्र कुठेही उल्लेख आढळत नाही. तसेच औषधे घेण्याचे प्रमाण हे वेगवेगळे नमूद के ल्याचे दिसून येते. हे कोणाकडून उपलब्ध केले आहे, त्यात योग्य प्रमाणात औषध मिसळले आहे का याबाबत कोणतीच खात्री नसल्याने याचा परिणाम कितपत होईल याबाबत अनेक प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाले आहेत.

दुसरीकडे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रचार होत असल्याने याची मागणी काही दिवसांत मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. औषध विक्रेत्यांनीही विक्री सुरू केल्याने घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसते. औषधाला आत्तापर्यंत विशेष मागणी नसल्याने उत्पादनही कमी पातळीवर केले जाते. अचानक मागणी वाढल्यास त्यामुळे याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे होमिओपॅथी डॉक्टरांनी मांडले आहे.

उत्पादकांकडून द्रव्य औषध आणि पांढऱ्या गोळ्या वेगवेगळे दिले जाते. आवश्यकतेनुसार द्रव्याचे योग्य पद्धतीने मिश्रण करून याची निर्मिती डॉक्टर करतात. त्यामुळे वितरक औषधांची निर्मिती योग्य पद्धतीने करत आहेत का याची तपासणी होणे गरजेचे आहे. संस्थांनी वाटप करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आणि परवानगी घेणे गरजेचे आहे. परवानगी दिलेल्या डॉक्टरांनाही औषधाची निर्मिती, दर्जा, दिल्या जाणाऱ्या सूचना यावर देखरेख करणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेण्याचे होमिओपॅथी आणि फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. जसवंत सिंग यांनी व्यक्त केले.

डोंबिवलीमध्ये अयोग्य पद्धतीने हे औषध बाटल्यांमध्ये भरून विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे आढळले होते. यावर अन्न व औषध प्रशासनानेही तपासणी सुरू केली आहे. शहरात १२ उत्पादकांकडून याची निर्मिती केली जाते. अचानक मागणी वाढली असल्याने भेसळ किंवा कमी दर्जाच्या औषधाची विक्री होण्याची शक्यता असल्याने या उत्पादकांकडून माहिती घेतली आहे.

‘ठोस नियमावली लवकरच’

अनेक ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेत लवकरच याबाबतची नियमावली आयुष विशेष कृती दलाकडून जाहीर केली जाईल, असे दलाचे सदस्य डॉ. सिंग यांनी सांगितले.