करोनाची लागण झाल्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून, त्यांना येत्या दोन-तीन दिवसांत घरी सोडतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

गेल्या आठवडय़ात धनंजय मुंडे व त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच त्याच दिवशी मुंडे यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य चार कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले.

भामरे, जोशी व दोन चालक यांचे चाचणी अहवाल नकारात्नक आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांनाही दोन-तीन दिवसांत घरी सोडतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.