25 April 2019

News Flash

शाळेतल्या औषधाची विषबाधा होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू

गोवंडी बैगनवाडी येथील महापालिकेच्या चार नंबर शाळेत शिकणाऱ्या चांदनी मोहम्मद रझा शेख या १२ वर्षीय मुलीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.

प्रातिनिधिक छायाचित्र

गोवंडी बैगनवाडी येथील महापालिकेच्या चार नंबर शाळेत शिकणाऱ्या चांदनी मोहम्मद रझा शेख या १२ वर्षीय मुलीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. तिला घरात उलटयांचा त्रास सुरु झाल्यानंतर लगेच राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले तिथे तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सोमवारी शाळेत काही गोळया वाटण्यात आल्या होत्या. या गोळया खाल्ल्यानंतर तिची प्रकृती बिघडली असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. या मुलीच्या मृत्यूनंतर शाळेतील १९६ मुलांना राजावाडी आणि ४३ मुलांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा गोळया खाल्ल्यानंतर त्रास सुरु झाला होता.

शाळेतल्या मधल्या सुट्टीत मुलांना देण्यात येणारे जेवण आणि गोळयांचे काही नमुने तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मुलांना ज्या गोळया वाटण्यात आल्या त्या आर्यन आणि फॉलिक अॅसिडच्या गोळया होत्या. शिवाजीनगर पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जे.जे. रुग्णालयात या मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे.

First Published on August 10, 2018 12:48 pm

Web Title: in govandi bmc school girl student death by medicine