21 September 2020

News Flash

दोन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिपळूण साहित्य संमेलनाचा समारोप

चिपळूण येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही तेव्हा

| December 12, 2012 04:12 am

चिपळूण येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही तेव्हा उपस्थित राहणार आहेत.  
समारोपास पर्रिकर यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संमेलन संयोजन समितीने केली होती. त्या विनंतीस मान देऊन पर्रिकर यांनी समारोपाला येण्याचे मान्य केले आहे.
संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात एकाच वेळी दोन राज्यांचे मुख्यमंत्री प्रथमच उपस्थित राहणार आहेत, असा दावा संमेलन आयोजकांकडून करण्यात आला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 4:12 am

Web Title: in preasence of chief minister chiplun sahitya samelan ending is done
टॅग Chief Minister
Next Stories
1 डोंबिवलीत ‘रिक्षावाल्या काका’कडून चिमुरडीवर बलात्कार
2 अल्पवयीन मुलीचे एक महिन्यापूर्वी अपहरण
3 मावळता सूर्य पाहण्याच्या नादात कळव्यातील अपघात
Just Now!
X