जागतिक स्तरावरील नामांकित विद्यापीठाच्या सहकार्याने राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती आणि ११ विद्यापीठांतील प्राध्यापकांचा कार्यबल गट स्थापन करण्यात आला आहे.

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने गेल्या वर्षी २८ ऑगस्ट २०१५ रोजी उच्च शिक्षणाचे जागतिकिकरण या विषयावर गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात अकृषी विद्यापीठांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाचा प्रसार होत आहे. मात्र जागतिक पातळीवर उपलब्ध असणारे गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, अशीही त्या परिषदेत चर्चा झाली होती. त्यानुसार आता राज्यातील उच्च शिक्षणाचे जागतिकिकरण करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.