इंद्रायणी नार्वेकर

एके काळी मुंबईतील करोनाचा सर्वाधिक संक्रमित भाग म्हणून ओळख असलेल्या धारावीत करोना आटोक्यात आणण्यासाठी पालिके ने केलेले प्रयत्न जगभरात ‘धारावी मॉडेल’ म्हणून ओळखले गेले. याच धारावीत आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नवे प्रारूप तयार करण्यात येत आहे. धारावीसाठी सोमवारपासून स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू होणार असून एकाच दिवशी हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. धारावीकरांना अ‍ॅपवर नोंदणीसाठी व डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासाठी मदत करण्याकरिता खासगी डॉक्टरांची व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

प्रतिसाद कमी

सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू असून त्याकरिता धारावीतून अतिशय कमी संख्येने लोक पुढे येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे येत्या सोमवारपासून धारावीतील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. लसीकरणासाठी या वेळीही स्वयंसेवी संस्था व खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. धारावीत अशिक्षित वर्ग तुलनेने अधिक आहे. त्यांना कोविन अ‍ॅपवर नोंदणी करण्याबाबत माहिती असेलच असे नाही. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन जागोजागी मदत के ंदे्र उभी करण्यात येणार आहेत. तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र देण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. माझे कु टुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणांतर्गत मिळालेल्या माहितीचा यात वापर के ला जाणार असल्याचीही माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

नियोजन काय?

धारावीतील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे दीड ते दोन लाख लोक हे ४५ ते ६० वयोगटातील, सहव्याधी असलेले तसेच ज्येष्ठ नागरिक असल्याचा पालिके चा अंदाज आहे. यांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण के ंद्रावर पाच कक्ष उभे करण्यात येणार आहेत. एकाच वेळी पाच जणांना लस देता येणार आहे. दिवसाला १००० लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.