पुढील आर्थिक वर्षांत इंटरनेट सुविधांचा विस्तार करण्यात येणार असून नेक्स्ट जनरेशन नेटवर्कच्या माध्यमातून ४ लाख जोडण्या देण्यात येतील. तसेच राज्यातील ५८ शहरांत १७४ ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट (क्षेत्रे) विकसित करणार असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. १०० कोटी ग्राहकांपर्यंत मोबाइल तर ४० कोटी ग्राहकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचल्या. देशातील २५६ शहरांत २५०० वाय-फाय क्षेत्रे तयार केली जातील. त्यातील ५८ शहरांतील १७४ क्षेत्रे महाराष्ट्रात असतील. महाराष्ट्र व गोवा विभागातील पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण आणि नांदेड शहरांत नेटवर्कच्या साहाय्याने वेगवान इंटरनेट सुविधा पुरवण्यात येतील.