‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या मंचावर आज तज्ज्ञांकडून मार्गदर्शन; बोरिवलीत सायंकाळी कार्यक्रम

निश्चलनीकरणाचे ५० दिवस संपुष्टात येत असताना पुढील भविष्यातील आर्थिक नियोजन कसे असावे, हे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या मंचावर गुरुवारी बोरिवलीत उलगडून दाखविण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असून काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणुकीबाबतचे मार्गदर्शनपर दुसरे सत्र २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होत आहे. सेंट अ‍ॅन्स स्कूल, सावरकर उद्यानाजवळ, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली (प.) येथे आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांना बचतीविषयक शंकांचे समाधान तज्ज्ञांना प्रश्न विचारून करण्याची संधी आहे.

कर सल्लागार प्रविण देशपांडे हे यावेळी ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे’ विशद करतील. फंडांचे प्रकार, त्यातील गुंतवणूक प्रमाण, परतावा आदींची तोंडओळख ते आपल्या या विषयावरील मार्गदर्शनातून करून देतील.

कमावत्या व वयाच्या विविध टप्प्यात ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ कसा करावा, हे सनदी लेखाकार तृप्ती राणे या सांगतील. गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यांची तुलना, गुंतवणूक रकमेचे प्रमाण व परतावा तसेच कर आदींबाबत त्या मार्गदर्शन करतील. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांबाबत निश्चलनीकरणानंतर काय धोरण असावे; नेमका काय निर्णय घ्यावा, हेही त्या सोदाहरणासह सांगतील.

कधी?

गुरुवार, २९ डिसेंबर २०१६

सायंकाळी ६ वाजता

कुठे?

सेंट अ‍ॅन्स स्कूल,

सावरकर उद्यानाजवळ, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली (प.), मुंबई</p>

तज्ज्ञ मार्गदर्शक

* अर्थनियोजनाचा श्रीगणेशा:   तृप्ती राणे

* म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे  फायदे :  प्रविण देशपांडे

प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.