वांगणी रेल्वे स्थानकावर एका लहानग्याला वाचवण्याऱ्या मयूर शेळकेला संपूर्ण देशानं सलाम ठोकला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघताना आजही अनेकांच्या अंगावर शहारा येतो. वांगणी स्थानकावर १७ एप्रिलला ही घटना घडली होती. देवदूतासारख्या मयूर शेळकेने त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. एका सेकंदाचाही विलंब झाला असता तर मयूरलाही जीव गमवावा लागला असता. पाईंटमन मयूर शेळके याच्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक झालं आणि त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला. मयूरला Jawa forty two Golden Stripes Nebula Blue ही मोटारसायकल बक्षीस देण्यात आली. जावा मोटरसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी आपला शब्द पाळत ही मोटारसायकल त्याल बक्षीस दिली.

वांगणी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एक अंध महिला मुलासह चालत होती. यावेळी मुलगा प्लॅटफॉर्मच्या कडेला असताना तोल जाऊन रुळावर पडला. ट्रेन अवघ्या सेकंदावर होती. त्यामुळे अंध महिला कासावीस होऊन आरडाओरड करत होती. ही बाब पाईंटमन मयूर शेळके यांना दिसली. त्याने क्षणाचाही विलंब न करता रुळावर धाव घेतली. एखाद्या चित्रपटातील दृष्य असल्यासारखी प्रत्यक्ष घटना अनेकांच्या काळजाचा ठोक चुकवून गेली. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला. जीवाची बाजी लावून त्याने चिमुकल्याला जीवदान दिलं.

महाराष्ट्रात सर्वांना मोफत लसीबाबत निर्णय कधी होणार? अजित पवारांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती!

मयुरने केलेल्या धाडसाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. अगदी रेल्वे मंत्र्यांनाही मयुरच्या या धाडसाची दखल घेत त्याचं कौतुक केलं आहे.