News Flash

अत्यावश्यक सेवेसाठी मोदी सरकारने मुंबईत लोकल ट्रेन सुरू कराव्यात, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाहीत...

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

“रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाहीत, त्यामुळे रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यांच्यासाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या”, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. ट्विटरद्वारे आव्हाड यांनी ही मागणी केली आहे.

यापूर्वी, करोनाव्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले आहेत. केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 9:07 am

Web Title: jitendra awhad asks modi govt to resume mumbai local train for emergency services sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीकडे लक्ष
2 २५ हजार रहिवाशांचे स्थलांतर
3 चित्रीकरण ठप्प असले तरी चित्रनगरी सुरूच
Just Now!
X