कालिना विद्यापीठ परिसरातील राज्य सरकारने बांधलेल्या ग्रंथालयाच्या कंत्राटाच्या बदल्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांविरोधात एक महिन्यात आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने जनहित याचिकेद्वारे केली आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस महाराष्ट्र सदनप्रकरणी भुजबळ आणि कुटुंबियांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.