16 January 2018

News Flash

कसाबला फाशी ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली – संजय राऊत

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल अमीर कसाबला फाशी देऊन राज्य शासनाने ख-या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहिली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय

मुंबई | Updated: November 21, 2012 1:07 AM

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल अमीर कसाबला फाशी देऊन राज्य शासनाने ख-या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहिली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कसाबला फासावर चढवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे, असे सांगत या कामगिरीबद्दल संजय राऊत यानी सरकारचे अभिनंदनही केले आहे. दहशतवादी अजमल कसाबला फाशी द्यावी ही बाळासाहेबांची इच्छा होती आणि जेव्हा जेव्हा त्यांनी मुंबई हल्ल्याबद्दल लिहिले किंवा जाहिर सभेत बोलले तेव्हा त्यांनी त्याचा उच्चार केला होता, असंही ते पुढे म्हणाले.
आज सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.

First Published on November 21, 2012 1:07 am

Web Title: kasab hanging true shraddhanjali to balasaheb thackeray sanjay raut
टॅग Kasab,Sanjay Raut
  1. No Comments.