04 March 2021

News Flash

Loksatta Tarun Tejankit: मागील वर्षी कविताने पटकावला पुरस्कार, यंदा नंबर तुमचा?

तुम्हीही यंदाच्या 'लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी नावनोंदणी करु शकता

कविता राऊत

‘सावरखेडा एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असणारी कविता राऊतने मागील वर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. शालेय शिक्षणासारख्या मूलभूत सुविधेसाठीही जाऊन-येऊन २० किलोमीटर पायपीट करावी लागे, असे कविता राऊतने एका मुलाखतीत सांगितले. पायांना लहानपणापासूनच अशी सवय आणि सराव मिळाल्यामुळे कविता जागतिक दर्जाची दीर्घ पल्ल्याची धावपटू झाली. तुम्हीही यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी अर्ज करु शकता. कसा कुठे कधी जाणून घ्या येथे क्लिक करुन

नक्की वाचा >> पहिल्या पर्वातील विविध क्षेत्रांमधील १२ लखलखते हिरे

वाचा >> ‘तरुण तेजांकित’ला भरभरून प्रतिसादाची झळाळी

साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण पाय रोवून काम करत आहेत. विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहात आहेत. नवे मानदंड निर्माण करत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत १२ तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आला.

यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वालाही भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांच्या आग्रहास्तव नावनोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नावनोंदणीसाठी.. : लखलखत्या हिऱ्यांचे यंदाचे शोधपर्व सुरू झाले आहे. त्यासाठी तरुणांनी  http://taruntejankit.loksatta.com/methodology/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जात माहिती भरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरांनाही आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 8:01 am

Web Title: kavita raut loksatta tarun tejankit award now its your turn
Next Stories
1 ‘मराठा आरक्षण घटनाबाह्य़च!’
2 भरारी पथकाच्या डॉक्टरांना सेवेत कायम करणार : शिंदे
3 दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणांत पुढील आठवडय़ात पुरवणी आरोपपत्र
Just Now!
X