आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि मंत्रीगटाची बैठक संपल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हा दावा केला आहे.

बैठकीत नेमके काय ठरले जाणून घेऊया

– आदिवासी भागातील रेशन कार्डाची तीन महिन्यात होणार दुरुस्ती

– वन जमिनीबाबत येत्या सहा महिन्यात घेणार निर्णय

– वन हक्क कायद्याचे दावे सहा महिन्यात संपवणार

– जीर्ण रेशन कार्ड सहा महिन्यात बदलून देणार

– संजय गांधी, श्रावणबाळ लाभार्थीचे मानधन सकारात्मक निर्णय घेऊ

– शेतकऱ्यांच्या ८० टक्क्याहून जास्त मागण्या मान्य – गिरीश महाजन

– 46 लाख लोकांना लाभ दिला, राहिलेल्या लोकांना लाभ दिला जाईल – मुख्यमंत्री