आंतरराष्‍ट्रीय मालमत्‍ता सल्‍लागार नाइट फ्रँकने त्‍यांचे प्राइम ग्‍लोबल सिटीज इं‍डेक्‍स सादर केले. हे इंडेक्‍स जगभरातील ४५ शहरांमधील लक्‍झरी निवासीच्‍या किंमतींमधील (अव्‍वल ५ टक्‍के गृहनिर्माण बाजारपेठ) हालचालींवर नजर ठेवते. इंडेक्‍सने निदर्शनास आणले की, २००९च्‍या अंतिम तिमाहीपासून लक्‍झरी निवासी किंमतींनी वार्षिक वाढीच्‍या सर्वात कमी दराची नोंद केली आहे.

दोन वर्षांपूर्वी प्राइम प्रॉपर्टी किंमती प्रतिवर्षाला ४.३ टक्‍के इतक्‍या सरासरी दराने वाढत होत्‍या. ही दरवाढ आता १.३ टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली आहे. २०१९च्‍या पहिल्‍या तिमाहीदरम्‍यान वाढीमधील घट बाबतीत जागतिक व्‍यापार युद्धाचा वाढता धोका, ब्रेक्सिट व आंतरराष्‍ट्रीय चलन निधीच्‍या प्रोजेक्‍शनबाबत अनिश्चितता हे कारणीभूत आहेत. २०१९ मध्‍ये जगातील ७० टक्‍के अर्थव्‍यवस्‍था विकासामध्‍ये मंदीचा सामना करतील. प्रमुख मुद्दे – २०१९च्‍या पहिल्‍या तिमाहीमध्‍ये इंडेक्‍स १.३ टक्‍क्‍यांनी वाढला, २००९च्‍या चौथ्‍या तिमाहीपासून ही सर्वात कमी वार्षिक दरवाढ आहे.

दिल्‍लीने अव्‍वल १० मध्‍ये स्‍थान मिळवत ७वे स्‍थान पटकावले, प्राइम प्रॉपर्टी दर १२ महिन्‍यांमध्‍ये ५.८ टक्‍क्‍यांनी आणि ३ महिन्‍यांमध्‍ये ४.४ टक्‍क्‍यांनी वाढले. बेंगळुरू शहराने १२ महिन्‍यांमध्‍ये २ टक्‍क्‍यांची आणि ३ महिन्‍यांमध्‍ये ०.८ टक्‍क्‍यांची वाढ पाहिली, हे शहर इंडेक्‍समध्‍ये २०व्‍या स्‍थानावर पोहोचले. ३१व्‍या स्‍थानावर असलेल्‍या मुंबईने १२ महिन्‍यांमध्‍ये ०.६ टक्‍के आणि ३ महिन्‍यांमध्‍ये ०.३ टक्‍क्‍यांच्‍या निराशाजनक वाढीची नोंद केली. यामधून परवडणा-या व मध्‍यमवर्गीय गृहनिर्माण विभागाला गती मिळाल्‍याचे दिसून आले.

जागतिक शहरांसंदर्भात युरोपियन शहरे इतरांना मागे ठेवण्‍यामध्‍ये पुढे राहिले आहेत. या तिमाहीमधील अव्‍वल १० रॅकिंग्‍जपैकी ७ रॅकिंग्‍ज युरोपियन बाजारपेठांनी प्राप्‍त केल्‍या आहेत. बर्लिन (१४ टक्‍के), फ्रँकफर्ट (१० टक्‍के), एडिनबर्ग (८ टक्‍के) आणि पॅरिस (८ टक्‍के) ही शहरे अग्रस्‍थानी आहेत. तर रशिया अॅण्‍ड सीआयएस हे २०१९च्‍या पहिल्‍या तिमाहीमध्‍ये सर्वात प्रबळ कामगिरी करणारे जागतिक क्षेत्र ठरले आहे.