असं म्हणतात, समुद्रामध्ये तीन कुंडं होती. राम कुंड, लक्ष्मण कुंड व सीता कुंड. मुंबईतील मलबार हिलवरील एक जागा रामकुंड नावानं ओळखली जाते. असं सांगितलं जातं की, प्रभू रामचंद्रांनी पिता दशरथ यांचं पिंडदान या रामकुंडावर केलं. ही जागा कोणे एकेकाळी तीर्थक्षेत्र होतं नी सगळीकडून इथं भाविक येत असत. त्यांच्यासाठी इथं धर्मशाळाही बांधण्यात आल्या होत्या… असा प्राचीन वारसा असलेली ही जागा आज मात्र घाणीचं साम्राज्य झाली आहे. भारताच्या इतिहासाचा मलबार हिलशी असलेला अनोखा संबंध सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या विशेष मालिकेचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.