News Flash

अनिल देशमुख प्रकरण: अहवाल लीक करण्यासाठी वकिलाने सीबीआय अधिकाऱ्याला दिला होता आयफोन

अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी तपास अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारीला लाच दिली होती.

Leaked Deshmukh report CBI SI Abhishek Tiwari took iPhone lawyer Anand Daga

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली. मुंबईतील बार आणि हॉटेलांकडून हप्तेवसुलीच्या आरोपप्रकरणी तपासाचा एक अहवाल फोडल्याच्या संशयावरून सीबीआयने देशमुख यांचे वकील आणि सीबीआयचेच पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर तपासाअंतर्गत अनिल देशमुख प्राथमिक चौकशी आणि भ्रष्टाचाराच्या खटल्याशी संबंधित माहिती आणि कागदपत्रे लीक करण्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारीला आयफोन १२ प्रो लाच म्हणून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासाबाबतचा अहवाल लीक केल्याबद्दल उपनिरीक्षक अभिषेक तिवारी आणि वकील आनंद डागा यांना अटक करण्यात आली आहे. देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी तपास अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारीला लाच दिली होती.

सीबीआयने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, अभिषेक तिवारी अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात पुण्यात गेले होते. ते वकील आनंद डागा यांनाही भेटले आणि माहिती देण्याच्या बदल्यात डागा यांनी त्यांना लाच म्हणून आयफोन दिला, अशी माहिती मिळाली आहे.”

अभिषेक तिवारीला डागा नियमितपणे लाच देत होते. तक्रारीत म्हटले आहे की तपास अधिकारी आर एस गुंजियाल यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक आणि संशयित अभिषेक तिवारी हे माजी मंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी ६ एप्रिल रोजी मुंबईत आले होते.

दरम्यान, डागा यांच्या अटकेनंतर त्यांना बुधवारी मध्यरात्री मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीत नेण्यात आले. गुरुवारी दुपारी डागा व तिवारी यांना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी दिली. तिवारी यांनी डागा यांच्यासह काही अज्ञात लोकांसोबत गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचला आणि सीबीआयचा तपास भरकटवण्यासाठी या प्रकरणातील संवेदनशील आणि गोपनीय कागदपत्रे वकिलाला पुरवली. स्वत:साठी गैरवाजवी फायदा आणि लाच मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले, असे सीबीआयचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 10:41 am

Web Title: leaked deshmukh report cbi si abhishek tiwari took iphone lawyer anand daga abn 97
Next Stories
1 तलावांतील जलसाठा ९० टक्क्यांवर
2 प्रतिबंधित इमारतींच्या संख्येत दुपटीने वाढ
3 रेल्वे हद्दीत विनामुखपट्टी प्रवाशांवरील कारवाई थंडावली
Just Now!
X