रेल्वे प्रशासनाची कारवाई; लिंबू सरबत निकृष्ट दर्जाचे

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहा आणि सातवरील स्टॉलवरील लिंबू सरबत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नमुन्यांच्या तपासणीअंती स्पष्ट झाले असून रेल्वे प्रशासनाने स्टॉलधारकावर तब्बल पाच लाख रुपये दंड ठोठावला आहे. कुर्ला स्थानकावरील या स्टॉलमध्ये अत्यंत अस्वच्छपणे लिंबू सरबत बनविण्यात येत असल्याची चित्रफित प्रसारमाध्यमांवर फिरत होती. या चित्रफितीची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने २६ मार्च रोजी या स्टॉलवर विकण्यात येणाऱ्या लिंबू सरबताचे नमुने पालिकेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाने त्याच दिवशी या स्टॉलला टाळेही ठोकले. नमुन्यांच्या तपासणीअंती लिंबू सरबत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्टॉलधारकावर पाच लाख रुपये दंड ठोठावला आहे.