आज रात्री सव्वादहापासून आठ तासांचा ब्लॉक; रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

चर्नी रोड ते ग्रॅण्ट रोड दरम्यान असलेल्या फेररे उड्डाणपुलावरील गर्डरच्या कामांसाठी शनिवार, ८ फेब्रुवारीच्या रात्री १०.१५ ते रविवारी सकाळी सव्वासहा वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान लोकल फेऱ्या होणार नाहीत. अप दिशेने येणाऱ्या लोकल मुंबई सेन्ट्रलपर्यंतच धावतील आणि याच स्थानकातून विरारच्या दिशेने गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. अशा १३६ फेऱ्या असतील. रविवारी मात्र पश्चिम रेल्वेकडून माहीम ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावर सकाळी ११ पासून पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मुख्य मार्गावरील लोकल सेवा सुरळीत राहील. मध्य रेल्वेकडून भायखळा ते माटुंगा डाऊन जलद मार्गावर आणि हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावरही ब्लॉकचे काम चालेल. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत राहील.

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान सर्व मार्गावर

कधी : शनिवार, ८ फेब्रुवारी रा.१०.१५ ते ९ फेब्रुवारी स.६.१५ वा

परिणाम : ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान लोकल फेऱ्या रद्द राहतील. त्यानिमित्ताने चर्चगेट स्थानकातून शेवटची धिमी लोकल बोरिवलीसाठी रात्री ९.५१ वाजता, तर विरारसाठी शेवटची जलद लोकल रात्री १०.०१ वाजता सुटेल. तर बोरिवलीतून शेवटची अप लोकल चर्चगेटसाठी रात्री ९.०३ वाजता, विरारमधून चर्चगेटसाठी शेवटची जलद लोकल रात्री ८.५१ वाजता सुटणार आहे.

पश्चिम रेल्वे

कुठे : माहीम ते गोरेगाव हार्बर : दोन्ही मार्ग

कधी : रविवार. स. ११ ते सायं. ४ वा.

परिणाम : हार्बरवरील सर्व गोरेगाव लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते गोरेगाव लोकल फेऱ्याही रद्द केल्या आहेत.

पुढील लोकल फेऱ्या रद्द

* गोरेगाव ते चर्चगेट – रा. ९.३२ वा.

* चर्चगेट ते अंधेरी -रा. १२.३१ वा.

* चर्चगेट ते गोरेगाव – प. ५.५९ वा. (रविवारी)

* गोरेगाव ते चर्चगेट- स. ७.०५ वा. (रविवारी)

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्ग

कधी : रविवार, अप मार्ग- स. ११.१० ते दु. ३.४० वा. आणि डाऊन मार्ग- स. ११.४० ते सायं. ४.१० वा.

परिणाम : सीएसएमटी, वडाळा ते वांद्रे, गोरेगाव, वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे- मुख्य मार्ग

कुठे : भायखळा ते माटुंगा डाऊन जलद मार्ग

कधी: रविवार, स.८.४० ते दु. १.१० वा.

परिणाम : सीएसएमटीतून सुटणाऱ्या जलद लोकल ब्लॉक काळात भायखळा ते माटुंगा स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर धावतील. माटुंगा स्थानकानंतर पुन्हा डाऊन जलद मार्गावर लोकल पूर्ववत होतील. या दिवशी लोकल फेऱ्या आणि मेल-एक्स्प्रेस उशिराने धावणार आहेत.