‘लोकसत्ता अर्थभान’च्या उद्याच्या उपक्रमातून उत्तर मिळणार; बोरिवलीत मार्गदर्शन सत्र

एकीकडे महागाई वाढते आहे, तर दुसरीकडे ठेवींवरील व्याजदर कमी होत आहेत. अशा वेळी भविष्यातील तरतूद म्हणून कोणता मार्ग किती प्रमाणात अंगीकारावा? त्यासाठीचे आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थभान’च्या मंचावर उपलब्ध झाले आहे.

यानिमित्ताने रविवार, २४ नोव्हेंबर रोजी बोरिवलीत तज्ज्ञ अर्थ नियोजनकारांचे गुंतवणूक मार्गदर्शन होत आहे. ‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रम सकाळी १०.३० वाजता सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे होईल.

उत्पन्न व खर्च यांची सांगड घालतानाच भविष्यातील आर्थिक तरतुदीविषयी काय धोरणे असावीत; वयाच्या कोणत्या टप्प्यात आर्थिक नियोजन कसे असावे, याबाबतचे मार्गदर्शन अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे करतील. आर्थिक नियोजनाशी संबंधित सध्याची स्थिती, कुटुंबाचा खर्च व उद्दिष्टे तसेच भविष्यातील गरज याबाबतही ते यावेळी प्रकाश टाकतील.

गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांच्या पसंतीचा अग्रक्रम असलेल्या म्युच्युअल फंड माध्यमातून गुंतवणूक व परताव्याचे ध्येय कसे साधता येईल याबाबत याप्रसंगी आर्थिक सल्लागार तृप्ती राणे मार्गदर्शन करतील. अन्य पर्याय व फंड यांची गुंतवणूक, परतावा तसेच जोखमेबाबत तुलना करतानाच फंडांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े आदींबाबत त्या सांगतील.

‘लोकसत्ता अर्थभान’च्या गुंतवणूकपर मागदर्शनपर यंदाच्या उपक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. कार्यक्रमासाठी काही जागा निमंत्रितांकरिता राखीव आहेत. यानिमित्ताने तज्ज्ञांमार्फत गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करून घेण्याची संधी उपस्थितांना मिळेल.

कधी? रविवार, २४ नोव्हेंबर २०१९,  सकाळी १०.३०

कुठे? सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड,

सावरकर उद्यानाजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई

मार्गदर्शक व विषय

तृप्ती राणे : म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ

कौस्तुभ जोशी : अर्थनियोजन महत्त्वाचे