विचारांच्या मुद्देसूद मांडणीला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणींकरिता ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेमध्ये नवा ‘ब्लॉग’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘ब्लॉग बेंचर्स’च्या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांना या नव्या लेखावर आपली मते आणि विचार मांडता येतील.

या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्या लेखावर विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीद्वारे व्यक्त व्हायचे आहे. गेल्या आठवडय़ात यासाठीचा पहिला लेख प्रसिद्ध करण्यात आला. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून भरभरून प्रतिसाद दिला आहे.

लक्षात ठेवावे असे..

या स्पर्धेकरिता दर आठवडय़ाला शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली एक नवीन लेख प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांना गुरुवापर्यंत आपल्या प्रतिक्रिया नोंदविता येतील.

  •  स्पर्धेचे स्वरूप आणि सहभागी होताना काय करायचे याचा सर्व तपशील indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावरील ‘एफएक्यू’मध्ये देण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी हा तपशील वाचून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे.
  •  लेखावर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी लेखाच्या शेवटी असलेल्या ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली असलेल्या ‘तुमची प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे लॉग इन करा’ या शीर्षकाखाली क्लिक करून तुमचे लॉग इन करून प्रतिक्रिया नोंदवायची आहे.
  • या लेखावर विद्यार्थ्यांना गुरुवापर्यंत आपल्या सवडीप्रमाणे ५०० ते ७०० शब्दांत लेखावरील किंवा त्या विषयावरील त्याची प्रतिक्रिया नोंदवायची आहे.
  • प्रत्येक विद्यार्थ्यांला दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखावर त्या आठवडय़ात फक्त एकदाच प्रतिक्रिया देता येईल.
  •  या लेखावरील प्रतिक्रियाच केवळ स्पर्धेसाठी ग्राह्य़ धरल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या किंवा अवांतर विषयावर लिहिलेल्या प्रतिक्रिया स्पर्धेकरिता ग्राह्य़ नसतील.
  •  ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना अपूर्ण माहिती भरली आहे, ते विद्यार्थी संकेतस्थळावर त्यांचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून इतर माहिती भरू शकतात. तसेच स्वत: फोटो आणि महाविद्यालयाचे ओळखपत्रही अपडेट करू शकतात.
  • या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सात हजारांचे, तर दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

लॉग इन करताना तांत्रिक अडचणी येत असल्यास विद्यार्थ्यांनी ’ loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.