07 July 2020

News Flash

लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०१९ : समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांचा शोध

या दुर्गाचे काम विधायक आणि समाजावर चांगला परिणाम करणारे असावे.

मुंबई  : परिस्थितीशी झगडत, अडथळ्यांवर मात करत, कष्टाची, टीकेची तमा न बाळगता अनेक स्त्रिया कार्यकौशल्याने आभाळाची उंची गाठत आहेत. आज असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे स्त्रियांचा सहभाग नाही. परंतु त्या सहभागापलीकडे जाऊन त्या क्षेत्रात ठसठशीत नाममुद्रा कोरणाऱ्या स्त्रियांचा ‘लोकसत्ता’ शोध घेत आहे. आमच्यापर्यंत अशा दुर्गाना पोहोचवा आणि त्यांच्या सन्मानासाठी आमच्याबरोबर सहभागी व्हा.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गेली पाच वर्षे समाजातील कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला सन्मानित करण्याचा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळा यंदाही उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा खणखणीत ठसा उमटवत समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या ‘दुर्गा’ची नावे पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या दुर्गाचे काम विधायक आणि समाजावर चांगला परिणाम करणारे असावे. ही माहिती फक्त पाचशे शब्दांत आणि नोंदी स्वरूपात पाठवावी. सोबत त्यांचे छायाचित्र, त्यांचा पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल आयडीही असावा. तुम्ही पाठवलेल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधून नऊ दुर्गाची निवड परीक्षक समिती करील आणि नवरात्रीचे नऊ दिवस त्यांची माहिती दररोज ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध करण्यात येईल.

त्यानंतर एका भरगच्च कार्यक्रमात नामवंतांच्या हस्ते त्यांच्या कर्तृत्वाचा जाहीर सन्मानही केला जाईल.

निवड करण्यासाठी..

’ उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, विज्ञान, संशोधन, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य वा अन्य कोणतेही क्षेत्र असो, तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील कर्तृत्ववान ‘दुर्गा’ची माहिती पुरस्कारासाठी पाठवू शकता.

’ नावे सुचविण्यासाठी आमचा पत्ता- लोकसत्ता नवदुर्गा, द इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड, प्लॉट नंबर ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई- ४००७१०.

प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

सहप्रायोजक : एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

पॉवर्ड बाय : व्ही. एम. मुसळूणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा.लि.

loksatta-navdurga@gmail.com या ई-मेलवरही आपण आपली माहिती पाठवू शकता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 1:02 am

Web Title: loksatta durga award for empowered women in society zws 70
Next Stories
1 दादर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, दिवसभरात चौथ्यांदा मध्य रेल्वेची बोंब!
2 एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
3 खुशखबर! निवड रद्द झालेल्या ११८ सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदावर मिळणार नियुक्ती
Just Now!
X