लोकसत्ता गप्पाचे दुसरे पर्व येत्या शनिवारी

साहित्य, संगीत, कलादी क्षेत्रांमधील दिग्गजांना अधिक जवळून जाणून घेण्यासाठी, त्यांच्या सर्जनशील हृदयात दडलेला माणूस शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमाचे दुसरे पर्व येत्या शनिवारी रंगणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या पर्वात साहित्ययात्री एस. एल. भैरप्पा यांचा प्रवास उलगडल्यानंतर सूर-तालाशी खेळत आपली जीवनयात्रा आनंदाचे निधान बनवणारे ज्येष्ठ गायक, संगीततज्ज्ञ आणि लेखक पं. सत्यशील देशपांडे या मैफिलीत सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम खास निमंत्रितांसाठीच असेल.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. पं. कुमार गंधर्व यांच्यासारख्या स्वयंभू कलाकाराच्या सान्निध्यात पं. सत्यशील देशपांडे यांनी संगीत साधना केली आहे. विशेष म्हणजे कुमारजींप्रमाणेच पं. सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता.

संगीताकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू जीवनाकडे आणि एकंदरीत त्यातील विविध पैलूंकडे कसा पाहतो, हे केसरी ट्रॅव्हल्स यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता गप्पां’मधून उलगडणार आहे.