लोकसत्ता लाइव्ह चॅटमध्ये तज्ज्ञांचे मतदारांना आवाहन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करताना मतदारांनी उमेदवारांचा पक्ष ध्यानात न घेता उमेदवाराचे काम हा निकष ठेवावा, असे स्पष्ट मत अ‍ॅक्शन फॉर गुड गव्हर्नन्स अ‍ॅण्ड नेटवìकग इन इंडिया (अग्नी) या संस्थेच्या श्यामा कुलकर्णी यांनी मांडले. लोकसत्ता ऑनलाईनतर्फे फेसबुक पेजवर ‘लाइव्ह चॅट’चे आयोजन केले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचचे अजित रानडे आणि प्रजा फाऊंडेशनचे मििलद म्हस्के उपस्थित होते. निवडणुकांविषयीचा अभ्यास असलेल्या या तज्ज्ञ मंडळींनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

महापालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे आणि निवडणुकीनंतरही पुढील पाच वष्रे जागल्याची भूमिका पार पाडावी असे, मत अजित रानडे यांनी मांडले. उमेदवारांना मतदान करण्याआधी त्यांची पाश्र्वभूमी जाणून घेतली पाहिजे, असे मििलद म्हस्के म्हणाले. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘अग्नि’तर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे श्यामा कुलकर्णी यांनी सांगितले. पालिका अथवा खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना मतदानासाठी आवाहन करण्याचे काम केले जाणार आहे.

मतदारराजाकडे असेलल्या ‘पॉवर’बाबत मतदारच अनभिज्ञ आहेत. मतदारांबाबत लोकप्रतिनिधींमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली पाहिजे, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

लोकप्रतिनिधी निवड सोपी..

निवडणुककाळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्या गोष्टी नागरिकांनी निदर्शनास आणून द्याव्या यासाठी ’सिटिझन ऑन पेट्रोल’ (सीओपी) हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय इलेक्शन वॉच, मायनेता डॉट कॉम, मुंबई व्होट्स डॉट कॉम आदी संकेतस्थळांवर उमेदवारांची माहिती जाणून घेता येईल, याबाबतही चच्रेदरम्यान माहिती देण्यात आली. या वर्षीपासून निवडणूक आयोगातर्फे प्रत्येक उमेदवाराची माहिती संक्षिप्त स्वरूपात मतदान केंद्रांबाहेर लावली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना आपला लोकप्रतिनिधी निवडणे सोपे होईल, अशी माहिती रानडे यांनी दिली. कोणताही उमेदवार योग्य वाटला नाही तर ‘नोटा’चा पर्यायही वापरू शकता. पण मतदान करणे जरुरी आहे, असेही त्यांनी सांगितले.