टिळकांच्या विचार आणि कार्याचा तज्ज्ञांकडून विविधांगी धांडोळा

मुंबई : ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील भारतातील संपूर्ण राजकारणाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे खेचून आणणाऱ्या आणि स्वातंत्र्य चळवळीचा पाया व्यापक करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त ‘लोकसत्ता’ने ‘एकमेव लोकमान्य’ हा खास विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन १ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड

प्रत्येक मराठी माणसाला लोकमान्य टिळकांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अभिमान असतोच. त्यांच्या कार्याचा विविध अंगांनी घेतलेला धांडोळा एकत्रितरीत्या वाचकांच्या हाती देण्याचा प्रयत्न ‘एकमेव लोकमान्य’ या विशेषांकात करण्यात आला आहे. आजघडीस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत ज्यांच्या विचारांचा प्रभाव आहे, अशा महाराष्ट्रातील विविध लेखकांच्या अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्ण लेखनाने हा अंक सिद्ध झाला असून तो वाचकांसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे.

देशाच्या राजकारणात आपल्या कुशल नेतृत्वाने लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. ब्रिटिश राजवटीविरोधात संघटितपणे लढा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा त्यांचा उपक्रम लोकप्रिय झाला. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंगच लोकमान्यांनी फुंकले. या आणि अशा अनेक घटनांचा देशाच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम झाला. लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा अभ्यास करणाऱ्या देशातील आणि महाराष्ट्रातील नामवंतांनी या विशेषांकासाठी आवर्जून लेखन केले आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय चंद्रचूड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर, ग. प्र. प्रधान, दि. के. बेडेकर, न. चिं. केळकर, सदानंद मोरे, सुहास पळशीकर, विनय हर्डीकर, अरुणा ढेरे, शेषराव मोरे, राजा दीक्षित, अविनाश धर्माधिकारी, डॉ. विजया देव, राहुल सरवटे यांच्या लेखनाने लोकमान्यांच्या विविध पैलूंवर ‘एकमेव लोकमान्य’ या विशेषांकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

भारतीय राजकारणात बाळ गंगाधर टिळक या नावाने जी उंच पताका फडकते आहे, तिचे विचारदर्शन या विशेषांकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घडणार आहे. त्यामुळेच हा विशेषांक प्रत्येक मराठी माणसाच्या घरात संग्राह्य़ होणे अत्यावश्यक आहे.

 

अग्रलेखांचे वाचन..  या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त १ ऑगस्ट रोजी विशेष ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात चंद्रकांत काळे, सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, प्रमोद पवार आणि अजित भुरे सहभागी होणार आहेत. हे कलावंत लोकमान्य टिळकांच्या गाजलेल्या अग्रलेखांचे वाचन करतील. हा कार्यक्रम ‘झूम’वर सायंकाळी ५ वाजता होणार असून त्यासाठी http://tiny.cc/LS_EkmevaLokmanya_1Aug येथे नोंदणी आवश्यक.

‘अ‍ॅमेझॉन’वरही उपलब्ध..

महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील मराठी जनांनाही हा विशेषांक मिळण्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाइन विक्री यंत्रणेमार्फत व्यवस्था करण्यात येत असून त्याची नोंदणी लवकरच सुरू होईल.

’प्रस्तुत : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.

’सहप्रायोजक : ग्रॅव्हीटस कॉर्प. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

’पॉवर्ड बाय : दि. टिळक क्रोनिकल आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट

’ऑडिओबुक पार्टनर : स्टोरीटेल अ‍ॅप