17 January 2021

News Flash

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिले पत्र

खरीपाच्या पीकासाठी हा महत्वाचा काळ असून महाराष्ट्रातील सर्व बँकांना शेतीसाठी कर्ज देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

खरीपाच्या पीकासाठी हा महत्वाचा काळ असून महाराष्ट्रातील सर्व बँकांना शेतीसाठी कर्ज देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिले आहे.

पीक कर्ज वाटपाची गती बँकांनी वाढवावी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तसे निर्देश द्यावेत असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे पण बँकांकडून संथगतीने कर्ज वाटप सुरु आहे.

बँकांच्या या प्रतिसादाची राज्य सरकारने दखल घेतली असून केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 9:36 pm

Web Title: maharashtra cm devendra fadanvis crop loan finance ministry
टॅग Finance Ministry
Next Stories
1 भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे यांची हत्या
2 सर्पदंश झालेला रुग्ण साप घेऊनच पोहोचला रुग्णालयात
3 धक्कादायक! वांद्रयात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन केली आत्महत्या
Just Now!
X