News Flash

मुख्यमंत्री फडणवीस यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पत्र, सुरक्षा वाढवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. मंत्रालयात एक निनावी पत्र आले असून त्यात मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. मंत्रालयात एक निनावी पत्र आले असून त्यात मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. मागच्या महिन्यात गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती तसेच आता पुण्यातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निनावी पत्र आले आहे.

या पत्रात आमचा मार्क्सवादाचा विचार तुम्ही संपवू शकणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान हे पत्र मिळाल्यानंतर गृहविभागाने मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा अधिक कडक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2018 2:37 pm

Web Title: maharashtra cm devendra fadanvis warning by naxalites
टॅग : Naxalites
Next Stories
1 Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018: ….म्हणून दहावी- बारावीत कोकण अव्वल
2 आमच्याही मुलांना चांगल्या शाळेत शिकायचंय, मात्र तुटपुंज्या पगारात भागत नाही : एसटी कर्मचारी
3 राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे सीआयडीकडून प्रसिद्ध, माहिती देण्याचे आवाहन
Just Now!
X