मुंबईच्या कुर्ला परिसरातील कपाडियानगर झोपडपट्टीत शनिवारी पहाटे लागलेली आग नियंत्रणात आली आहे. आज सकाळी ५.३० वाजता येथील भंगाराच्या दुकानात शॉकसर्किटमुळे ही आग लागली. त्यानंतर आग वेगाने पसरत गेली.  आग लागलेला झोपडपट्टीचा  परिसर मिठी नदीला लागून आहे. दरम्यान, या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्णपणे विझविण्यात त्यांना यश आले. दरम्यान, आग लागल्यामुळे येथील काही झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये भंगाराचे दुकान, साडीचे दुकान आणि लाकडाच्या वखारीचा समावेश आहे.  हा परिसर दाटीवाटीचा असल्याने सुरूवातीला अग्निशमन दलाला आग विझविण्यात अडचणी येत होत्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.