कुपोषण आणि बालमृत्यूने लोकसभेत टीका

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्य़ातच मोठय़ा प्रमाणावर कुपोषणामुळे बालमृत्यू झाल्याचा विषय लोकसभेत उपस्थित झाला होता. गेल्या वर्षी बालमृत्यूवरून सावरा यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते.

लोकसभेत गेल्या आठवडय़ात काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी कुपोषण आणि बालमृत्यू यावरून राज्यातील भाजप सरकारला लक्ष्य केले होते. मेळघाट आणि पालघरमध्ये कुपोषण आणि बालमृत्यू ही गंभीर समस्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कुपोषण आणि बालमृत्यू यांना आळा घालण्याकरिता केंद्र सरकारने २०१९ पर्यंत देशभर चार लाख अंगणवाडय़ा बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०१६ अखेरीस या योजनेतंर्गत राज्यात २८९ अंगणवाडय़ा बांधण्याचे उद्दिष्ट होते. पण या काळात महाराष्ट्रात एकही अंगणवाडीचे काम झालेले नाही याकडे अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले. यावर अंगणवाडय़ांचे काम झाले नसल्यास ही गंभीर बाब असल्याचे मान्य करीत राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी महाराष्ट्र सरकारला या संदर्भात सूचना केली जाईल, असे उत्तर दिले.

पालघरमध्ये झालेल्या बालमृत्यूकडे लक्ष वेधीत चव्हाण यांनी, महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री सावरा यांच्या जिल्ह्य़ातच हे बालमृत्यू होत आहेत. सावरा यांनी पालकमंत्री किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून बालमृत्यू रोखण्याकरिता उपाय योजले नाहीत, असेच चव्हाण यांनी सूचित केले.

लोकसभेत गेल्या आठवडय़ात काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी कुपोषण आणि बालमृत्यू यावरून राज्यातील भाजप सरकारला लक्ष्य केले होते.

पालघरमध्ये झालेल्या बालमृत्यूकडे लक्ष वेधीत चव्हाण यांनी, आदिवासी विकासमंत्री सावरा यांच्या जिल्ह्य़ातच हे बालमृत्यू होत आहेत. त्यावर उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली होती.