मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनयाची छाप पाडणारी आणि काही दिवसांपूर्वीच ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत ‘आवली’च्या भूमिकेतून प्रेक्षकांवर भुरळ पाडणारी ऋजुता देशमुख ही मंगळवारी ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाली.

खरेदी आणि बक्षीस असा दुहेरी आनंद मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात या फेस्टिव्हलमध्ये ‘आवली’च्या उपस्थितीमुळे आणखीच रंगत आली. ऋजुताने बोरिवली पूर्वेकडील शांतीवन येथील एम के घारे ज्वेलर्सला भेट दिली. ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’मुळे सर्वसामान्य आणि गरजू व्यक्तींना बक्षीस जिंकण्याची संधी मिळत आहे. गेल्या वर्षी या उपक्रमातून एका कंडक्टरला बक्षीस मिळाल्याचे ऐकून खूप आनंद झाला, अशी भावना ऋजुताने व्यक्त केली. त्याशिवाय या उपक्रमात कलाकारांना सहभागी करून घेतल्यामुळे आम्हाला आमच्या कामातून उसंत मिळते आणि प्रेक्षकांशी संवाद साधता येतो. प्रेक्षकांच्या उत्साहामुळे कलाकार सुखावत असतो. त्यामुळे एम के घारे ज्वेलर्सच्या दुकानाला भेट दिल्यावर तेथील ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, याचा अतिशय आनंद असल्याचे ऋजुताने सांगितले.

या उपक्रमात बृहन्मुंबई परिसरातील अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या शोरूम्सनी सहभाग घेतला आहे. ‘लोकसत्ता मुंबई शॉिपग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दररोज सुवर्णमुद्रा, चांदीचे नाणे, एलईडी टीव्ही, फ्रिज, गिफ्ट कूपन अशी आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत.

महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला कार व दुसऱ्या विजेत्याला ‘केसरी टुर्स’कडून सहलीचे पॅकेज यांसारखी पारितोषिके दिली जाणार आहेत. रविवार, ९ एप्रिलपर्यंत हा खरेदी महोत्सव सुरू राहणार असून शेवटचे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करून आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘रिजेन्सी समूह’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ‘पितांबरी’ सहप्रयोजक आहेत.

ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टुर्स’, बँकिंग पार्टनर ‘युनियन बँक’, पॉवर्ड बाय ‘तन्वीशता’ आणि ‘वास्तु रविराज’, तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ आणि ‘श्री नेमिनाथ ज्वेलर्स’ हे फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर तसेच ‘सावंत ज्वेलर्स’ आणि ‘सौभाग्य ज्वेलर्स’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. तर हेल्थ पार्टनर म्हणून ‘ब्रह्मविद्या साधक संघ’, याशिवाय ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’, ‘देसाई बंधू आंबेवाले’, ‘मिलन लाइफस्टाइल्स’, ‘पर्शिया दरबार’ आणि ‘अजय अरविंदभाई खत्री’ हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत.

‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे एम के घारे ज्वेलर्सच्या शुभा घारे यांनी सांगितले, तर सोन्याचा व्यवसाय हा विश्वासार्हतेवर अवलंबून असतो आणि या उपक्रमामुळे ‘लोकसत्ता’सारख्या दर्जेदार वृत्तपत्राशी नाते निर्माण झाले याबद्दल आनंद आहे. आमच्याकडे येणारा बहुतांश ग्राहक हा ‘लोकसत्ता’चा वाचक असल्यामुळे या उपक्रमाला चांगली पसंती मिळत आहे, असेही घारे यांनी नमूद केले.