ठाण्यात रविवारी सकाळी हिरानंदानी ग्रुपतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतील एका उमद्या धावपटूचा मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
कासारवडवली पोलिसांनी सांगितले, कांदिवली येथे राहणारे सुरेश चेरुशेरा (वय ४७) हे अर्थमॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पत्नीसह ठाण्यात आले होते. सुरेश यांनी अर्धमॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर त्यांना जागेवरच भोवळ येऊन ते खाली पडले.
त्यांना तातडीने त्यांच्या पत्नी, संयोजकांनी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरेश हे व्हॉलीबॉलचे उत्तम खेळाडू होते. ते नियमित त्याचा सराव करीत असत. मॅरेथॉन स्पर्धेसाठीही त्यांनी सराव केला होता, असे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2013 रोजी प्रकाशित
मॅरेथॉन स्पर्धेतील धावपटूचा मृत्यू
ठाण्यात रविवारी सकाळी हिरानंदानी ग्रुपतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतील एका उमद्या धावपटूचा मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
First published on: 25-02-2013 at 02:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathon compitition player died