मध्य रेल्वे
भायखळा-विद्याविहार डाऊन धिमा मार्ग
वेळ : सकाळी ११.२० ते दुपारी ३.२०
परिणाम- सकाळी ११.०४ ते दुपारी ३.२१ दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन डाऊन धिम्या मार्गावरून सोडण्यात येणाऱ्या गाडय़ा भायखळा व विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला येथे थांबून या गाडय़ा डाऊन धिम्या मार्गावरून जातील.
ठाण्याहून सकाळी ११.२१ पासून दुपारी ३.२५ पर्यंत अप जलद मार्गावरून जाणाऱ्या गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर तसेच कुर्ला स्थानकांसह नियोजित स्थानकांवर थांबतील. परिणामी या गाडय़ा १५ मिनिटे विलंबाने धावतील. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सकाळी ११.१५.०८ ते दुपारी २.५१ दरम्यान धावणाऱ्या डाऊन जलद गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलंड येथे थांबतील. परिणामी या गाडय़ा २० मिनिटे उशिरा धावतील.
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान सुटणाऱ्या गाडय़ा १० मिनिटे विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे
कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन
ुवेळ : स. ११.०० ते दुपारी ३.००.
परिणाम : पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या वेळेत बंद राहणार आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पनवेल, बेलापूर आणि वाशी येथे जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२३ ते दुपारी ३.०१ या वेळेत बंद राहणार आहे.  
पश्चिम रेल्वे
बोरिवली ते गोरेगाव धिम्या मार्गावर
वेळ : स. १०.३५ ते दुपारी ३.३५.
परिणाम : धिम्या मार्गावरील गाडय़ा बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच काही गाडय़ा रद्द होतील. या काळात बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक ३, ४, ५, ६ आणि ६ ए यापैकी कोणत्याही फलाटावर गाडय़ा थांबतील.