मुंबई :  दहिसर ते डीएन नगर मेट्रो मार्ग २ ए आणि दहिसर ते अंधेरी पूर्व मार्गावर पहिली प्रोटोटाइप ट्रेन उपलब्ध झाल्याने मेट्रो लाईन २ ए आणि ७ वरील धनुकरवाडी ते आरे दरम्यान २० किमी अंतरावर मेट्रोच्या डायनॅमिक आणि  धावण्याच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत.

या डायनॅमिक चाचणीच्या कालावधीत सहा डब्यांची प्रोटोटाइप ट्रेन वेगवेगळ्या वेगाने धावेल. डायनॅमिक अवस्थेत विविध उपप्रणाली आणि उपकरणांची चाचणी केली जाणार आहे.  सिग्नलिंग, प्लॅटफॉर्म, स्क्रीन दरवाजे, टेलिकॉम एकत्रिकरणाव्यतिरिक्त कामगिरी सिद्ध करणाऱ्या चाचण्या के ल्या जातील. या चाचण्या दोन महिने होतील आणि त्यानंतरच भारत अर्थ मूवर्स लिमिटेडने तयार केलेली पहिली प्रोटोटाइप ट्रेन कामगिरी आणि सुरक्षा चाचणीसाठी ‘आरडीएसओ’ला देण्यात येईल.