News Flash

‘म्हाडा’च्या अभय योजनेत सेवा शुल्कावरील व्याज माफ

अनेक वसाहतींनी सेवा शुल्काचा भरणा केलेला नाही.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : ‘म्हाडा वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा रहिवासी यांच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करून सवलत देणारी अभय योजना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने जाहीर के ली आहे. १ एप्रिल १९९८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील थकीत सेवा शुल्काच्या रकमेवरील व्याज माफ करण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

मुंबईत ‘म्हाडा’च्या ५६ हून अधिक वसाहती असून त्यांना पंप हाऊसची देखभाल, पंप चालकाचे वेतन, टँकर्सची आपत्कालीन दुरुस्ती, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन, स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य आदी सुविधा ‘म्हाडा’कडून उपलब्ध के ल्या जातात. या बदल्यात ‘म्हाडा’ या वसाहतींमधील रहिवाशांकडून सेवा शुल्क वसूल करते. मात्र अनेक वसाहतींनी सेवा शुल्काचा भरणा केलेला नाही. सेवा शुल्काच्या या थकीत रकमेवर ‘म्हाडा’ व्याजाची आकारणी करते. अभय योजनेनुसार मुंबई मंडळांतर्गत विविध योजनेतील गाळेधारकांकडून १ एप्रिल १९९८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील शिल्लक सेवा शुल्काची वसुली गाळेधारकांकडून करण्यात येणार आहे. तसेच ‘म्हाडा’च्या तिजोरीत ही रक्कम जमा करणाऱ्या गाळेधारकांना प्रोत्साहन म्हणून या थकीत सेवा शुल्काच्या रकमेवरील एप्रिल १९९८ ते मार्च २०२१ या कालावधीचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत सेवा शुल्क पुढील ५ वर्षांत १० समान हप्त्यामध्येही वसाहतींना भरता येणार आहे. वसाहतींना हे सेवाशुल्क १० हप्त्यांत भरायचे असल्यास सेवा शुल्काच्या रकमेवर ८ टक्के वार्षिक व्याज दर आकारला जाईल, असेही ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:01 am

Web Title: mhada abhay yojana waives interest on service charges akp 94
Next Stories
1 निर्बंधांचा बोट पर्यटनाला फटका
2 जन्मदाखल्यामुळे तुरुंगात जाण्यापासून तरुणाची सुटका
3 बंद शाळांच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधींची उधळपट्टी
Just Now!
X